बुधवार, १७ सप्टेंबर, २००८

काही सोप्या पाककृती

दुध-पोहे
वेळ :- ५ मिनिटे
साहित्यः१.दुध२.जाड पोहे३.वेलची +जायफळ पुड्-चिमुटभर४.साखर५.चवीनुसार मीठ
कॄती :एका बाऊल मध्ये १ कप जाड पोहे घेउन त्यात दुध गरम करुन टाकावे (पोहे दुधात भिजेपर्यत).वरुन वेलची +जायफळ पुड्-चिमुटभर आणी साखर जेतके गोड हवे असेल तितकि,चवीनुसार मीठ टाकावे.दुध-पोहे तयार ........
===============================================================
मक्याच्या दाण्याचा चाट
वेळ :- १० मिनिटे
साहि त्यः१.उकड्लेले मक्याचे दाणे२.बटर३.मिरपुड४.लाल तिखट५.चवीनुसार मीठ
कॄती :एका बाऊल मध्ये उकड्लेले मक्याचे दाणे,थोडे बटर,मिरपुड,थोडे लाल तिखट,आणी चवीनुसार मीठ घालुन छान मिक्स करणे.मक्याच्या दाण्याचा चाट तयार.........
»

गुरुवार, २८ ऑगस्ट, २००८

नमस्कार
मी जयश्री केरकर ,माज्या ब्लॉग वर आपले स्वागत करते .